बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : किचकट प्रकरणे व इतर अनेक कारणामुळे वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहिलेली अनेक उदाहरणे आपण ऐकत आलो आहोत. परंतु दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी तत्परता दाखविल्यास वादी प्रतिवादींना किती लवकर न्याय मिळू शकतो याचे उत्तम उदाहरण बार्शीत पहायला मिळाले आहे.
    दिवाणी न्यायालयातील सह दिवाणी न्याशाधिश (क.स्तर) मा.शेख अकबर शेख जाफर यांच्या कोर्टात दिवाणी दावा दाखल झाला आणि अवघ्या चार महिन्यांत त्यांना बार्शी न्यायालयाने न्याय दिला आहे.
      एका कुटूंबातील पती-पत्नीचे कोणतेही संबंध मागील पंधरा वर्षांपासून राहिले नसल्याने पत्नीने पोटगीच्या दाव्या दाखल केला. याचा निकाल देतांना न्यायालयाने दावा मान्य केला व पतीच्या वडिलोपार्जीत जमीनीवरुन पत्नीस तिचा हक्क मिळवून दिला. सदरच्या हुकूमनाम्याची घटना समजल्याने यातील प्रतिवादीची बहिण असलेल्या महिलेने न्यायालयात धाव घेतली. यामध्ये वडिलोपार्जीत जमीनीचा एकत्र हिस्यातील आपला हिस्सा स्वतंत्र मिळाला नसल्याने त्यावर कोणताही बोजा दाखविण्यात येऊ नये व तिने आपला हिस्सा स्वतंत्र मिळावा अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचे लेखी, तोंडी पुरावे आणि युक्तीवाद झाल्यानंतर न्या.शेख अकबर शेख जाफर यांनी न्याय दिला. वादीच्या वतीने अॅड्.सी.पी.विश्वरुपे, प्रतिवादीच्या वतीने अॅड.पी.आर.करंजकर, अॅड्.एस.के.शिंदे यांनी काम पाहिले.
 
Top