बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता अल्पदरात सुरु केलेल्या छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी वसतीगृह कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार युवराज छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांनी काढले. भविष्यात वसतीगृहाचा विस्तार करुन जास्त विद्यार्थ्यांची सोय करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
    सर्वसामान्यांना शिक्षणाची सोय सुकर व्हावी याकरिता अमोल नवले यांनी सुरु केलेल्या वसतीगृहास सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, तालुकाध्यक्ष अनंत काशीद, राष्ट्रवादी नगरसेवकांचे गटनेते नागेश अक्कलकोटे आदी उपस्थित होते.
 
Top