कळंब (बालाजी जाधव) :- 'आम्ही कळंबकर' ग्रुपचे श्रीकृष्ण कळंबकर, जयप्रकाश देवद्वारे, महादेव पवार या तिघांनी कळंब येथील सहारा एचआयव्ही बाधित मुलामुलींच्या बालगृहास जवळपास चाळीस हजार रुपयांचे सोलार वॉटर हिटर भेट दिले आहे. दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
व्यवसायासाठी पुणे येथे वास्तव्यास असलेल्या श्रीकृष्ण कळंबकर, जयप्रकाश देवद्वारे, महादेव पवार युवकांनी आपणही समाजाचे देणे लागतो, ज्या मातीत आपला जन्म झाला, त्या मातीचे आपण काही देणं लागतो, या भावनेतुन 'आम्ही कळंबकर' ही संघटना स्थापना करुन व्यवसायासाठी व नौकरीसाठी बाहेरगावी वास्तव्यास असणा-या युवकांना एकत्र करुन ते नेहमी कळंब येथील सामाजिक उपक्रमात भागत घेतात.
प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कळंब येथे येऊन विविध वंचितांना मदत करतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी यावर्षी सहारा एचआयव्ही बालगृह कळंब येथील बालकांना हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ मिळावी, यासाठी स्वखर्चातून चाळीस हजार रुपये खर्च करुन या बालगृहास सोलार वॉटर हिटर भेट दिले.
त्याचबरोबर कळंब येथील मधुकर पवरे यांनीही शहरातील मुलांना गणवेश वाटप केले. मिटु पांचाळ यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी कळंबचे उपनगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, श्रीकांत कळंबकर, बाळासाहेब धस, डॉ. रुपेश कवडे, शिवाजी बारटक्के, शिवाजी पंचमिरे, ज्ञानेश्वर बारटक्के, मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, सुनंदा गायकवाड, तुकाराम अडसूळ, सहारा बालगृहाच्या अधिक्षिका श्रेया बाराते, राम काळे, सुधाकर रणदिवे, चित्रा चौधारी, रंजना उंदरे आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रुबा कोठावळे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण यांनी मानले.