बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या दस्तगीर दर्गाहच्या दुरुस्तीचा प्रश्‍न मागील काही वर्षांपासून रखडल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला होता. या प्रश्‍नासाठी ना.सोपल यांनी १५ लाखांचा निधी मंजूर करुन कामाला सुरुवात करुन प्रश्‍न निकाली काढल्याची माहिती गटनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली.
    हा किल्ला दर्गाह सुमारे ५० फुट उंच, पुरातन आहे याच्या बाहेरील बुरुजाची बाजू तसेच भिंती २००७ मधील अतिवृष्टीने ढासळल्या, सदरच्या जागेची मालकी शासनाची असल्याने दर्गाहच्या भक्तांनी दुरुस्तीची मागणी केली होती. या कामाचा शुभारंभ रविवारी दि.२६ रोजी माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांच्या हस्ते करण्यात आला.
     यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड्. अब्दुलगन्नी तांबोळी, नगराध्यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक ऍड्.असिफ तांबोळी, उस्मानअली शाह, गुलमहंमद आतार, गुलाबभाई शेख, मुर्तजभाई शेख, मौला मुलाणी, इम्तियाज तांबोळी, आबा पवार, दत्ताआण्णा शिंदे, डॉ.म्हेत्रे, भाऊ मंडलिक, अंबादास शिंदे, श्रीकांत शिंदे, बप्पा कसबे, रमेश पाटील, मंगलताई शेळवणे, अरुणा परांजपे, संदिप बारंगुळे, मनिष चव्हाण, ऍड्.विकास जाधव, ऍड्.नितीन सोडळ आदी उपस्थित होते.
    दस्तगीर दर्गाह किल्ला तटबंदीसाठी १५ लाखांचा निधी ना.सोपल यांनी मंजूर केला असून किल्ल्याचा अनमोल ठेवा जतन करण्यासठी पश्‍चिमेकडील संरक्षक तटबंधीसाठी आणखी १५ लाखांचा निधी मंजूर करण्याचे तसेच बार्शीसह काटेगाव, मालवंडी आदी ठिकाणी हिंदू मुस्लिम समाजाच्या श्रध्दास्थान असलेल्या दर्गाहची जपवणूक करण्यासाठी शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत कॉंक्रीट रस्ते, संरक्षक भिंत, मदिना मस्जिद शेजारील लेंडीनाल्यावरील कॉंक्रीटीकरण, शादीखाना, आतार समाज सभागृह संरक्षक भिंत, रमजानभाई तांबोळी सभागृह विस्तारीकरण आदी कामेही मार्गी लागली आहेत.
 
Top