नळदुर्ग :- मन आणि विचार समृध्‍दीसाठी माणसाने पुस्‍तकांशी गोष्‍टी करावी, मंदिराएवढे महत्‍त्‍व ग्रंथालयाला असून त्‍यासाठी या ज्ञान मंदिरात सतत गेले पाहिजे, असे प्रतिपादन मराठवाडा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक ज्ञानेश्‍वर पाटील यांनी केले.
         मानेवाडी (ता. तुळजापूर) येथे प्रजासत्‍ताक दिनाचे औचित्‍य साधून यशवंतराव चव्‍हाण सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्‍यात आले. त्‍याप्रसंगी ते पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्‍येष्‍ठ नागरीक बलभीमराव कटके तर प्रमुख पाहुणे म्‍हणून पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे, ग्रामसेवक आर.एस. नवगिरे, जय मल्‍हार युवा मंचचे तालुकाध्‍यक्ष इंद्रजित देवकर आदीजण उपस्थित होते. प्रारंभी ज्ञानेश्‍वर पाटील यांच्‍या हस्‍ते विद्येची देवता सरस्‍वती यांच्‍या पूजनाने व फित कापून उदघाटन करण्‍यात आले. मानेवाडी येथे प्रथमच वाचनालयाची सुरुवात होत असल्‍याने पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यांनी चार हजार रुपयांची व इंद्रजित देवकर यांनी दोन हजारांची ग्रंथ संपदा वाचनालयाला प्रदान केली. याप्रसंगी जिल्‍हा परिषद शाळेच्‍या चिमुकल्‍यांनी सारे आम्‍ही एक आहोत याची दर्शन घडविणारी मुख नाटिका सादर केली.
          यावेळी बोलताना साहेबराव घुगे म्हणाले की, उशिरा का होईना गावातील युवकांनी पुढाकार घेऊन वाचनालयाची सुरुवात केली असून यामध्‍ये सातत्‍य ठेवून वाचन संस्‍कृती वाढवावी, याचा परिणाम पुढील काळात गावच्‍या अनेक वस्‍तीवर दिसून येईल, असे सांगितले. याप्रसंगी ग्रामसेवक नवगिरे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास माजी उपसरपंच राम माने, ग्रामपंचायत सदस्‍या रेखा देवकर, उपसरपंच शाहूराज माने, महेश बर्वे, तंटामुक्‍त समितीचे भिमराव टकले, आनंद हाके, मनोहर माने, माजी सरपंच भारताबाई हाके, सतीश हाके, पारुबाई लकडे यांच्‍यासह विद्यार्थी, महिला, नागरीक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सूत्रसंचालन महादेव माने यांनी केले. ज्ञानेश्‍वर पाटील व ग्रामसेवक नवगिरे यांनी वाचनालयास 51 पुस्‍तके देण्‍याचे जाहीर केले.
 
Top