बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील दहिवडकर मठाचे लिंगैक्य वरसिध्द शिवाचार्य यांच्या जन्मशतमान उत्सवानिमित्त तसेच गुरुसिध्द शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या एकसष्ठीनिमित्त शिवनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
    दि. ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या शिवनाम सप्ताहामध्ये परमरहस्य पारायण, शिवपाठ, रुद्राभिषेक, धार्मिक प्रवचन, आरती, दिक्षाविधी, महाप्रसाद, भजन आदी कार्यक्रम दहिवडकर मठ येथे होत आहेत. या सप्ताहाबरोबरच दि. ५ फेब्रुवारी रोजी काशी जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांची भव्य शोभायात्रा तसेच सिध्दांत शिखामणी ग्रंथदिंडी शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात येत आहे. श्रीगुरु गुरुसिध्द शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या एकसष्ठीनिमित्त तुलाभार संत मन्मथस्वामी सेवा संघाच्या वतीने लिंगायत बोर्डिंग येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात येत आहे.
    या कार्यक्रमासाठी रेवणसिध्द शिवाचार्य परंडकर, डॉ.जयसिध्देश्वर गौडगावकर, मुक्तेश्वर वेळापूरकर, निलकंठ धारेश्वरकर, प्रभुदेव माढेकर, महादेव वाईकर, गंगाधर औंधकर, रविशंकर रायपाटनकर आदी शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश वाईकर, प्रशांत कानडे, धनंजय धारुरकर, शैलेश घाणेगावकर, बाबा शिराळ, उमेश घरबडे, रामचंद्र महाजन, विजय थळकरी, शाम थळपती, अनिल खराडे, अभिजीत गंगावणे, शिवा स्वामी, महादेव स्वामी आदी परिश्रम घेत आहेत.
 
Top