उस्मानाबाद -: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातंर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या विद्यमाने येथील जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला येथे दि. 15 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत ग्रंथ महोत्सव-2014 चे  आयोजन करण्यात आले आहे.
    शनिवार,दि. 15 रोजी सकाळी 8-30 वाजता  जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ. सकाळी 11 वा. ग्रंथ महोत्वाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.भास्कर चंदशिव यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जि.प.चे  अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे  तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.चे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे, जि.प.चे सभापती पंडित जोकार, धनंजय सावंत, दगडु धावारे,  आणि श्रीमती सविता कोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दु.2 ते 4 या वेळेत साहित्यातील वैज्ञानीक जाणीवा आपण स्विकारल्या आहेत काय ? या परिसंवाद कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.कमलादेवी आवटे तर  प्रा.अर्जुन जाधव, अॅड. राज कुलकर्णी, रविंद्र केसकर, अॅड. देविदास वडगावकर, श्रीरंजन आवटे यांचा सहभाग राहणार आहे. सायं. 4 ते 6 या वेळेत निमंत्रित विद्यार्थी व विद्यार्थींनींचा सांस्कृतिक कार्यक्रम.
     रविवार, दि. 16 रोजी दु.12 ते 2 या वेळेत वाद विवाद स्पर्धा. (विषय- यशवी जीवनासाठी वाचन आवश्यक आहे /नाही, वाढत्या तंत्रज्ञानाचा वाचन संस्कृतीवर परिणाम होत आहे काय, वाचायचे का नाचायचे.) दु. 3 ते 5 या वेळेत कवि संमेलनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले असून या काव्य संमेलनाच्या  अध्यक्षस्थानी- जेष्ठ कवि राजेंद्र अत्रे यांची उपस्थिती राहणार असून सूत्रसंचलन रविंद्र केसकर करतील.  (सहभाग- बालाजी इंगळे, बाळु घेवारे, सुभाष चव्हाण, भाग्यश्री वाघमारे, रुपेश जावळे, युवराज नळे, शेखर गिरी, विजय गायकवाड, पंडित कांबळे, सुधीर कुलकर्णी, हनमंत पडवळ, शंकर कसबे,अंजली यादव). सायं.5 वा. सांस्कृतिक कार्यक्रम- वऱ्हाड निघाल लंडनला, सादरकर्ते दस्तीगर पठाण, भूम.
    सोमवार,दि 17 रोजी स. 10 ते 12 या वेळेत कथा कथनाचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कुंभार एस डी तर (योगीराज वाघमारे, शिवराज मेनकुदळे, विलास सिंदगीकर, आसाराम लोमटे, अरुण गिरी यांचा सहभाग राहणार आहे.  दु. 12 ते 2 या वेळेत काव्य वाचन- मला भावलेली /स्वरचित कवीता, सहभाग-निमंत्रित विद्यार्थी, अध्यक्षस्थान डी. के. शेख भुषवतील. सुत्र संचलन- आनंद वीर. दु. 3 वाजता जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम होईल. यावेळी  प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.अनंत आडसुळ, साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे हे उपस्थित राहणार आहेत.
    या ग्रंथोत्सव महोत्सवास जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी व रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
 
Top