उस्‍मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा  उस्‍मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत आहेत.  त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत असून त्‍याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
     शुक्रवार,दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9-50 वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.10 ते 11 वाजेपर्यंत उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा व सांगवी येथील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दु.1 वा. घुग्गी येथील  सांस्कृतिक सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. दु. 3 ते 4 वाजेपर्यंत नितळी व इर्ला येथील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायं. 6 वा. काजळा येथील सांस्कृतिक सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण.
      शनिवार,दि.15 रोजी स.10 वा. अणदूरहून वरुडा ता.उस्मानाबादकडे प्रयाण, स.10-30 वा. काँग्रेस शाखेच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. स. 11-30 वा. किणी येथील सांस्कृतिक सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती.दु. 1 वा. हिंगळजवाडी येथील दलित वस्ती रस्त्याच्या भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु 2 वा. नेहरु युवा केंद्र उस्मानाबादच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ : पुजारी मंडळ मंगल कार्यालय,तुळजापूर) सायं. 4 वा.कोळेवाडी ता.उस्मानाबाद येथील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायं. 5-30 वा. मुळेवाडी येथील दलित वस्ती रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रम. सायं. 6 वा. गोपाळवाडी येथील काँग्रेस शाखेच्या उदघाटन व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार अणदूर ता.तुळजापूरकडे प्रयाण. आगमन, राखीव व मुक्काम.
    रविवार,दि. 16 रोजी स. 9-30 वा. अणदूर येथून वागदरी  ता. तुळजापूरकडे प्रयाण. स. 10 वा. तेथील ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमास उपस्थिती. स.11-30 वा. देवसिंगा नळ सैपन बंदेअली शेख यांच्या सुकन्येच्या शुभविवाहास उपस्थिती.दु. 12 वा. देवसिंगा नळ येथून मुर्टा, ता.तुळजापूरकडे प्रयाण, दु.1 वा. मुर्टा येथील सत्यवान सरवसे यांचेकडील  कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थिती. दु.2-30 वा. मुर्टा येथून तुळजापूरकडे प्रयाण. दु.3-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायं.5 वा. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते अशोक मगर गौरव समिती, तुळजापूरतर्फे अशोक रंगनाथराव  मगर यांच्या गौरव समारंभास उपस्थिती.  ( स्थळ: माऊली लॉज समोर, एस. टी. डेपोच्या पाठीमागे, तुळजापूर). सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
 
Top