उस्मानाबाद -: गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या, महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने कार्यरत असणा-या महिला व मुलांकरिता सहाय कक्ष, जुने पोलीस स्टेशन, कळंब येथे दि.15 फेब्रुवारी,2014 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून अध्यक्षस्थानी कळंब न.प. चे नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांची उपस्थिती राहणार आहे.
या केंद्रामार्फत महिला व मुलांकरिता समुपदेशन करण्यात येते. या कार्यक्रमास कळंब तालुक्यातील जास्तीत महिला व मुलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी वैभव सुर्यवंशी व लोक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केले आहे.