बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त दि. १६ फेब्रुवारी रोजी खुल्या गटासाठी बुध्दीबळ स्पर्धा, दि. १९ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धा, दि.२० फेब्रुवारी रोजी शरद गोरे यांचे शिवचरित्र या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा उपळाई रोडवरील मारुती मंदिरात होत असून बुध्दीबळ स्पर्धेकरिता १००१ ते ५०१ रुपयांचे पारितोषिक, चित्रकला स्पर्धेतील इ.१ ली ते ४ थी लहान गटासाठी ५०१ ते २०१, इ.५ वी ते १० वी मोठ्या गटासाठी ७०१ ते ३०१ रुपयांचे पारितोषिके प्रमाणपत्र, प्रत्येक स्पर्धकास जिजाऊ चरित्र पुस्तक तसेच आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. पंच म्हणून बुध्दीबळ स्पर्धेस भालके सर तर चित्रकला स्पर्धेस हर्षद लोहार हे काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी नितीन धस, प्रसाद पांडेकर, मोहित मांजरे, अतुल नलगे यांचेशी संपर्क साधावा.