बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थनास अकलूज येथे मेळावा झाला. या मेळाव्यास जनसेवा संघटनेच्या बार्शी शाखेतील ६१ चारचाकी वाहनांतून कार्यकर्त्यांची फौज हजर होती.
     लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेल्या माढा मतदारसंघासाठी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मंगळवारी अकलूजच्या श्रीराम मंदिरात शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापले असून जिल्हाध्यक्ष वैभव पाटील,बार्शी यांच्या नेतृत्वाखाली बार्शीचे शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले. बार्शीतील परंपरागत राजकिय व्यक्तींनी बार्शीतील जनसेवा संघटनेची मोर्चेबांधणी पाहून स्वत:च्याच तोंडात बोट घातले आहे.
 
Top