बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महाराष्ट्रातील बर्याच सूतगिरण्या कामगारांच्या विविध प्रश्नासाठी झालेल्या आंदोलनात नेस्तनाभूत झाल्या. महाराष्ट्रातील बोटावर मोजण्यासारख्या असलेल्या सूतगिरण्यांपैकी चांगल्या दर्जाचे उत्पादन करणारी शासनाची सूतगिरणी कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे अडचणीत सापडली आहे.
दि.१९ पासून अशोक यमगर, धनराज शिंदे, अमर शिंदे, सचिन गायकवाड, कृष्णा खंडागळे हे बार्शी टेक्स्टाईल मिल या सूतगिरणीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
बार्शीच्या वैभवात भर टाकणारे व स्थानिक कामगारांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार्या बार्शीतील चारही सूतगिरण्यांचे भोंगे यापूर्वी सतत वाजत होते. विविध कारणास्तव यातील तीन सूतगिरण्या बंद पडल्या व लिलावात निघाल्या. एकमेव सुरु असलेल्या बार्शी टेक्स्टाईल मिलवर शासनाचा अंकुश राहिल्याने अत्यंच चांगल्या रितीचा कारभार सुरु राहिला. कुशल कर्मचारी, कर्मचार्यांची हितावही अधिकृत संघटना, राजकिय व्यक्तींचा कोणताही अडथळा नाही, अधिकारी वर्गांचे वैयक्तिक लक्ष, महिला कामगारांची लक्षणीय संख्या, अत्याधुनिक मशिनरी, सातत्य, चिकाटी, दर्जा यामुळे बार्शीचे नांव सूतगिरणीच्या इतिहासात प्रथम स्थानावरच राहिले आहे. बदलत्या धोरणांनुसार कर्मचार्यांची नियुक्ती करतांना आवश्यकतेनुसार कर्मचार्यांची भरती, शासकिय नियमानुसार वेतन, इतर सुविधा यावर लक्ष देत असतांनाच कंत्राटी कर्मचारी पुरविणार्या विविध खाजगी संस्थांची मदत घेऊन या सूत गिरणीचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे.
अशातच कंत्राटी कामगारांनी विविध प्रश्नांसाठी आंदोलन छेडले आहे. वेतन, सेवेतील खंड करण्याची पध्दत, प्रबोधन कालावधी, सातत्याने तिसर्या पाळीत काम नको, प्रश्न मांडण्याची संधी इत्यादी प्रश्न घेऊन कंत्राटी कामगार आमरण उपोषणास बसले आहेत.
याबाबत सूतगिरणीच्या अधिकार्यांशी चर्चा केली असता सदरच्या कंत्राटी कामगारांना शासकिय नियमानुसारच वेळच्यावेळी वेतन अदा करण्यात येते, अधिकच्या कामांचा मोबदला देण्यात येतो. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने कर्मचार्यांना सेवेत कायम सामावून घेण्यात येते, महिला कर्मचार्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना रात्रीच्या पाळी कामावर घेणे टाळून त्याऐवजी पुरुषांनाच काम देण्यात येते त्यामुळे काही कर्मचार्यांना जादा वेळा रात्रीची पाळी देण्यात येते. संप व आंदोलन सुरु असल्याने काही कामगारांची काम करण्याची इच्छा असतांनाही त्यांना दहशतीने काम करता येत नाही. आयटकचे कॉं.तानाजी ठोंबरे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याची आमची तयारी आहे. शासनाच्या चांगल्या युनिटचा व कायद्याचा विचार करुन ठोंबरे यांनी कर्मचार्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. चर्चा करुन योग्य त्या कायद्यानुसार व नियमानुसार कर्मचार्यांचे सर्व हक्क मिळावे याला आमचाही आक्षेप नाही. कोणाच्या तरी हट्टापायी इतर सामान्य नागरिकांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सदरच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊन अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. कामगार अधिकारी हे चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.