बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील संषर्घयात्री प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त निमंत्रीतांच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    या स्पर्धा २६ व २७ रोजी सायं.५ ते रात्रौ १० पर्यंत पांडे चौक येथे होत असून प्रत्येक स्पर्धकांना १२ मिनीटांचा अवधी देण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, रावसाहेब मनगिरे, पंचायत समितीचे सभापती कौसल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अरुण बारबोले, जिल्हापरिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
     या स्पर्धेत सहभागी सर्धकांनी पुढील विषय देण्यात आले आहेत. १) महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवराय, २) मंत्री जोमात, जनता कोमात, विकासांचे स्वप्न फक्त भाषणात, ३) ऊस पेटला, ४) गरिबांचा भारत, श्रीमंतांचा इंडिया, दरी कमी होणार का?, ५) महाराष्ट्रातील मावळा आपसातच लढत आहे, छत्रपतींचा इतिहासाचा गड किल्ल्यामध्ये रडत आहे. या स्पर्धेकरिता औरंगाबाद, मुंबई, पुणे, लातूर, नाशीक, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर इत्यादी भागातील स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.
        विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रथक क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय २० हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ ५ हजार, उत्तेजनार्थ २ हजार १०० व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक दिपक राऊत, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष काका फुरडे, आरोग्य सेलचे सरचिटणीस महावीर कदम, उमेश काळे, विजय चव्हाण, अभिजीत गाढवे, युवराज ढगे आदी प्रयत्न करीत आहेत.
 
Top