सोलापूर :- कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणा-या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/ युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एस.एस.बी. परिक्षेची मुलाखत पत्रे मिळाली आहेत अशा उमेदवारांनी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी दि. 20 फेब्रुवारी 2014 ते 1 मार्च 2014 (एकूण 10 दिवस) असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात आलेली असून भोजनासाठी प्रति दिवस 54 रुपये प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.
    तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि. 12 फेब्रुवारी 2014 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे खालीलप्रमाणे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0217-2731035 वर संपर्क साधावा.
 
Top