पांगरी (गणेश गोडसे) -:  बार्शी शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्‍याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटांसह गारांचा 25 ते 30 मिनिटे पाऊस पडला असुन द्राक्षे, आंबा, ज्वारी, गहु यासह भाजीपाल्यांच्या पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामीण भागात पांगरीसह कारी, उक्कडगांव, कांदलगांव, आगळगांव, कुसळंब, घारी, पुरी, गोरमाळे, नारी, जामगांव आदी बार्शी तालुक्यातील गांवात सर्वदुर अवकाळी पाऊस पडला आहे.
  दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत होती. सायंकाळच्या दरम्यान अचानक आकाशात ढग जमा होऊन अवकाळी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पंधरा मिनिटे पाऊस पडल्यानंतर विश्रांती घेत पुन्हा वरूणराजाने बरसायला सुरूवात केली. र्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्‍यातील कारी, उक्कडगांव, पांगरी, पांढरी आदी द्राक्ष बागांच्या पटयात हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागायतदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. काढुन टाकण्‍यात आलेल्या ज्वारी गहु कांदा आदी पिकांना मोठी हानी पोहचली आहे. धीच चटके सोसट असलेल्या शेतक-यांना निसर्गानेही झटके दिल्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
 
Top