सोलापूर :- जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावत करतांना ज्या मतदारांची नावे चुकीने वगळली आहेत किंवा  18 वर्ष पूर्ण आहेत अशा मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी  नांव नोंदणीसाठी मतदारांनी ही अंतिम संधी राहणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
    भारत निवडणूक आयोगाने सन 2013 हे वर्ष मतदार याद्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्यावत करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांच्यामार्फत घरोघरी तपासणी केली असता कही मतदार मयत, स्थलांतरीत,  दुबार, मिसींग आढळून आले अशा मतदारांच्या बाबतीत सर्व मतदार संघामये वगळणी बाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
    मयत मतदारांची नांवे वगळणी करतांना बी. एल. ओ. चा अहवाल, स्थानिक स्वराज्य संस्थेचा मृत्यू दाखला किंवा नातेवाईकाकडून भरणेत आलेल्या फॉर्म 7 द्वारे नावे वगळणीची कार्यवाही करण्यात आली आहे. स्थलांतरीत मतदारांच्या बाबतीत त्यांचा नवीन पत्ता माहिती असेल तर नवीन पत्यावर नोटीस देऊन सुनावणी घेऊनच नांवे वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. स्थलांतरीत  मतदारांचा पत्ता माहित नसेल तर शेवटच्या माहीत असलेल्या पत्यावर पंचनामा करुन नोटीस डकवणे आणि दि. 22/7/2013 ते 3/8/2013 या कालावधीत दैनिक तरुण भरत वृत्तपत्रात नोटिस देऊन नाव वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. दुबार मतदरांच्या बाबतीत नोटिस देऊन सर्वसाधारण वास्तव्याच्या ठिकाणचे नाव मतदार यादीत ठेऊन दूसरे नाव वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. वगळणी करण्यात    येणा-या सर्व मतदार संघातील भागनिहाय मतदारांच्या नावांची यादी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधीत मतदार केंद्र, नगरपालिका कार्यालय, महानगरपालिका व त्यांचे वार्ड कार्यालय येथे डकवून प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. सदर ग्रामसभा /वार्डसभा/ प्रभागसभा नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी वगळणी करावयाच्या मतदारांची नावे नागरिकांसमोर वाचून दाखविलेली आहेत. त्याबाबत ज्या मतदारांच्या प्राप्त झालेल्या सूचना, हरकती ची नोंद घेऊन  वगळणी करण्यात आलेली आहे.
    वरील प्रमाणे सर्व कार्यवाही करुन वगळणी करण्यात आलेल्या स्थलांतरीत, दुबार, मयत, मिसिंग मतदारांची नावाची यादी www.ceo.maharashtra.nic.in  या वेबसाईटवर जाऊन Search yoyr name in final Electoral Roll 2014  वर जाऊन तसेच प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये आहेत का हे तपासुन  घ्यावेत. अंतिम मतदार याद्या संबंधित सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्व्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध आहेत.  तसेच सर्व तहसिल कार्यालयात मतदार मदत केंद्र ( Help Center) स्थापन करण्यात आलेले आहे. निवडणूक विषयक अधिका माहितीसाठी www.facebook/deosolapur  हे फेसबूक पेज व  www.twitter.cm/deosolapur हे twitter अकाऊंट तयार करण्यात आलेले आहे. ज्या मतदारांची नावे चुकीने वगळली गेली आहेत किंवा 18 वर्ष पूर्ण आहेत अशा नविन मतदारांनी संबधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार नोंदणी फॉर्म क्र. 6 भरुन द्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
 
Top