सोलापूर :- सहकार खात्यामार्फत घेतल्या जाणा-या जी.डी.सी. ॲन्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा दि. 24, 25, व 26 मे 2014 रोजी घेतली जाणार असून त्याबाबतचे अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ई ब्लॉक, कलेक्टर कंपाऊंड, सोलापूर) येथे दि. 10 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2014 पर्यंत उपलब्ध आहेत. अर्ज स्विकारण्याचा अंतिम    दि. 24 फेब्रुवारी 2014 पर्यंत आहे यानंतर येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाची किंमत    रु. 50 असून परीक्षा शुल्क रु. 800 आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
    सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षेसाठी स्वतंत्र आवेदन पत्र भरावे लागणार असून त्याचे परिक्षा शुल्क रु. 500 आहे. सदर दोन्ही परिक्षेची सविस्तर माहिती प्रवेश पत्रासोबत देण्यात येणा-या अधिसूचनेमध्ये नमूद केलेली आहे. तसेच या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावली आहे असे, बी.टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांनी कळविले आहे.
 
Top