कळंब (भिकाजी जाधव) -: वृत्तपत्रामध्ये फोटोग्राफर महत्वाचा दुवा असुन तालुका पत्रकार संघाने प्रेस फोटोग्राफर यांना सुरक्षा कवच देऊन वेगळा उपक्रम राबवला असल्याचे मत हसेगाव (केज) ता. कळंब येथील उपसरपंच विलास पाटील यांनी व्यक्त केले.
      कळंब तालुका पत्रकार संघाने पत्रकारांबरोबर वृत्तपत्र फोटोग्राफर यांनाही सुरक्षा कवच (विमा पॉलिसी) चे वितरण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवसिंह राजपूत होते. यावेळी प्रेसफोटोग्राफर राजाभाऊ पवार, गणेश शेळके यांना विलास पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक करून यापुढील काळातही पत्रकार बांधवांना मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी बोलताना प्राचार्य मोहेकर यांनी वृत्तपत्र क्षेत्रातील व्यक्तींना संरक्षण महत्वाचे असुन वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणा-या पत्रकार, एजंट, वृत्तपत्र वाटप करणारे, प्रेस फोटोग्राफर यांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. तालुका पत्रकार संघाने हा आगळा वेगळा उपक्रम राबवून कळंबचे नाव राज्यभर उज्वल केले आहे. समाज बदलासाठी वृत्तपत्र महत्वाचे साधन असल्याने त्यात काम करणा-या व्यक्तीही तितक्याच महत्वाच्या असल्याचे मत शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांनी व्यक्त करून पत्रकार संघास शुभेच्छा दिल्या.
      यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एस. जाधव, प्रा. अंकुश पाटील यांच्या हस्ते रमेश आंबिरकर, भिकाजी जाधव, कलायोगचे संपादक शरद आडसुळ, गणेश मोरे, सुनिल देशमुख, परमेश्वर पालकर यांना विम्याचे वितरण करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवसिंह राजपूत यांनी केले. यावेळी सतिश टोणगे, शितल धोंगडे, परवेज मुल्ला, बापूराव जाधव, मंगेश यादव, अनिल गाडे, गणेश शेळके, भिकाजी जाधव, शरद आडसुळ, रमेश आंबिरकर, शिवप्रसाद बियाणी यांची उपस्थिती होती.
 
Top