पांगरी (गणेश गोडसे) :- शेतकरी, कामगार, गरीब, दलित, पिडीत आदी वंचित घटकांसाठी भारतीय शेतकरी संघटना सतत प्रयत्नशिल राहील, कोणाच्या दबावाला संघटना भिक घालणार नसुन शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी रहावू शकतो, असे प्रतिपादन भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी व्यक्त केले.
    चिंचोली (ता. बार्शी) येथे भारतीय शेतकरी संघटनेच्या नामफलकाच्या उदघाटनप्रसंगी पठाण हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाउ शिंदे हे होते .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्‍यात आली. यावेळी संघटनेच्या इतर पदाधिका-यांनीही संघटनेबाबत आपले विचार व्यक्त केले.
    शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष दिपक बोधले यांनी शेतक-यांच्या विविध प्रश्‍नावर ही संघटना सदैव अग्रेसर राहुन शेतक-यांना न्याय मिळवुन देण्‍यासाठी प्रयत्नशिल राहील, असे आश्‍वासन दिले. यावेळी बार्शी शहर उपाध्यक्ष तनविर पठाण, शाखा उपाध्यक्ष उमेश बोधले, संतोष शिंदे, दत्तात्रय पवार, सुरेश शिंदे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top