उस्‍मानाबाद -: श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली ट्रस्‍टच्‍यावतीने अखंड हरिनाम सप्‍ताह, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा, शिवलिलामृत ग्रंथ पारायणास मंगळवारपासुन प्रारंभ झाले आहे. या पारायण सोहळ्याचा सांगता समारंभ बुधवार दि. 5 मार्च रोजी प्रकाश महाराज बोधले डिकसळकर यांच्‍या काल्‍याच्‍या किर्तनाने होऊन महाप्रसाद वाटपाने होणार आहे.
          उस्‍मानाबाद येथील संत ज्ञानेश्‍वर माऊली ट्रस्‍टचे संस्‍थापक अध्‍यक्ष वसंतराव नागदे यांनी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण सोहळा कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 9 ते 11 गाथा भजन, 11.30 ते 3 ज्ञानेश्‍वरी पारायण, 4 ते 6 शिव‍लिलामृत ग्रंथपारायण प्रवचन, सायंकाळी 7 ते 9 हरिकिर्तन, 10 ते 4 हरिजागर कार्यक्रम होणार आहेत. 
         बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. कमलाकर महाराज हारंगुळकर यांचे शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण प्रवचन, दि. 27 रोजी दत्‍तात्रय महाराज येवले सोनेगावकर व भारत महाराज काकोट दासखेडकर, दि. 28 रोजी हरि महाराज लवटे आचलबेटकर, दि. 1 व दि. 2 मार्च रोजी दत्तात्रय महाराज अंबीकर डिकसळ यांचे ज्ञानेश्‍वरी भावचिंतन या विषयावर प्रवर्चन होईल. तर सोमवार दि. 3 मार्च रोजी आप्‍पा महाराज जावळे हाळदगांवकर (आळंदी) व नाना महाराज कदम नेकनूरकर (बीड), दि. 4 रोजी एकदशस्‍कंध उध्‍दवगीता या विषयावर भागवताचार्य नंदू महाराज रणशूर वैरागकर यांचे प्रवचन होणार आहे.
       जयवंत महाराज बोधले धामणगावकर (पंढरपूर), संदीपान महाराज शिंदे हसेगावंकर (आळंदी), सदाशिव महाराज झणझणे (खाडे पारगाव, बीड), सुभाष महाराज सुर्यवंशी (केडगांवकर, अहमदनगर), जगन्‍नाथ महाराज पाटील (ठाणे), धर्मराज महाराज हंडे (पुणे), प्रल्‍हाद महाराज शास्‍त्री दैठणकर (परभणी), बाबासाहेब महाराज इंगळे (चिंचवडगावकर, बीड) यांचे किर्तन होणार आहे. 
     त्‍याचबरोबर रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागराचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top