सोलापूर :- दि. 1 जानेवारी 2014 अर्हता दिनांकावरील आधारित पुनरिक्षण कार्यक्रमानंतर दि. 31 जानेवारी 2014 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी मतदार याद्या अद्यावत करणे आवश्यक आहे. अनेक मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत, त्यामुळे संपूर्ण मतदार यादी फोटो नसलेल्या मतदारांची यादी व वगळण्यात आलेल्या मतदार यादीचे ग्रामसभा / वार्ड सभा घेऊन वाचन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले आहे.
     यासाठी दि. 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2014 या कालावधीत नागरिकांना याची माहिती होण्यासाठी ग्रामसभा / वार्ड सभांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर सभेत नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी संपूर्ण मतदार यादी, फोटो नसलेल्या मतदारांची यादी व वगळणी केलेले मतदाराची यादीचे वाचन करावे. मतदार यादीत नाव  नसलेल्या युवक / युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये फॉर्म क्र. 6 भरून नोंदवावे. तसेच ज्या महिला नव्याने लग्न होऊन आलेल्या आहेत व इतर महिलांनी फॉर्म क्र. 6 रहिवास व वयाचे पुराव्यासह मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करावा.
     तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये फोटो नाहीत अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)  यांच्या मार्फत फोटो जमा करावेत. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांनी मतदानाच्या दिवशी भयमुक्त वातावरणात मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top