नळदुर्ग :- राज्याचे पशुसंवर्धन, मस्त्यव्यवसाय व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते दि. 22 फेब्रुवारी रोजी ज्ञानकिरण विशेषांकचे प्रकाशन झाले. नळदुर्ग येथील आपलं घर या ठिकाणी ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अणदूर यांच्या वतीने संत रविदास (रोहिदास) यांच्या जीवन कार्यावर आधारित हा विशेषांक काढण्यात आला.
          यावेळी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की. जसे जात धर्म यांचा विचार न करता सर्वांना समान मानून संत सर्वांची सेवा करतात. त्याप्रमाणे आपणही जात, धर्म यापासून दुर राहून संघटीत होऊन एकदिलाने काम करावे. संतांसारखी माणसे समाजात दुर्मिळ असतात.  या विशेषांकासाठी ज्ञानकिरण संस्थेचे भैरवनाथ कानडे यांनी खुप प्रयत्न केले, त्यांची धडपड स्त्युत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
           याप्रसंगी जि.प.चे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जि.प.सभापती पंडीत जोकार, पं.स. तुळजापूरचे उपसभापती प्रकाश चव्हाण, राजाभाऊ शेरखाने, नितीन शेरखाने,विकास गायकवाड, राजलक्ष्मी गायकवाड हे उपस्थित होते.
        अध्यक्ष पदावरुन बोलताना डॉ. व्हट्टे म्हणाले की, संतांचे विचार काय आहेत हे जाणून त्याचे ज्ञान व भान ठेवणे आवश्यक आहे.आपल्या आजूबाजूला असलेल्या गुणवंतांचे भान ठेवावे. त्यांची संगत ठेऊन प्रत्येकाने पुढे जावे. यावेळी  पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले. सुत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.
 
Top