बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अन्नसुरक्षा योजनेतील देण्यात येणारे धान्य अपुरे असल्याने वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने मोर्चा व बार्शी तहसिलसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
    यावेळी शहराध्यक्ष एल.बी.शेख, तालुकाध्यक्ष बाबुराव जाधवर, उमेश स्वामी, सचिन गायकवाड, विक्रम सावळे, पोपट वीर, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, सिकंदर आतार, गुलमोहम्मद आतार, श्रीधर कदम, पांडू घोलप, आरपीआयचे तानाजी बोकेफोडे, महंमद चितापूरे आदी उपस्थित होते.
    भगवंत मैदान ते तहसिल कार्यालय निघालेला मोर्चा तिरंगी ध्वज हातात घेऊन घोषणा देत शहरातून तहसिल कार्यालयासमोर आला. याठिकाणी आंदोलनकर्त्यांसाठी मंडप व बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली.
     यावेळी एल.बी.शेख यांनी बोलतांना कमी करण्यात आलेले धान्य वाढवून द्यावे, केशरी शिधापत्रिकाधारकांना गरिब अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करुन घ्यावे, राजीव गांधी आरोग्य योजनेचे ओळखपत्र तातडीने देण्यात यावे अन्यथा यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. संघटनेच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार यांनी स्विकारले. या धरणे आंदोलनासाठी सचिन नवगण, राहुल काळे, रणजीत व्हनमाने, फिरोज पठाण, अकिब शेख, दयानंद स्वामी, इमाम लांडगे, रमिद शेख, अय्युब बागवान, पप्पू व्हनमाने, बबलू शेख, भरत म्हेत्रे, रमेश देशमाने, विकी झव्हेरी, प्रदिप माळी, आनंद लोहार, अक्षय तामीले, राहूल शेंडगे, उमेश देशमाने, लक्ष्मण चव्हाण, दिपक सावंत, किरण निकम, अखिल शेख, चंद्रकांत घोलप, भागवत कावरे, किसन वायकर, रज्जाक क्षीरसागर यांच्यासह विविध भागातून आलेले आंदोलक सहभागी झाले होते.
 
Top