उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन वैभव सुर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव, उस्मानाबाद यांनी केले आहे.