उस्मानाबाद :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर एक युवक, एक युवतीस तसेच एका नोंदणीकृत संस्थेस देण्यात येणार असून युवक/ युवतीसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह  रोख रक्कम 10 हजार तर संस्थेस 50 हजार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठीचे प्रस्ताव 28 फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.
      युवक व युवतीसाठी पुरस्कारासाठीचे निकष पात्रता खालीलप्रमाणे आहेत. अर्जदार युवक व युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे, जिल्ह्यात त्याचे वास्तव्य सलग 5 वर्षे तर राज्यस्तर पुरस्कारासाठी  राज्यात  10 वर्षे वास्तव्य असावे, मरणोत्तर वा विभागून देण्यात येणार आहे, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासेाबत उदा- वृत्रपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो आदि देणे आवश्यक आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एक जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक /कर्मचारी  पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
     संस्थेसाठी निकष, पात्रता - पुरस्कार संस्थेस विभागून दिले जाणार नाही. संस्थेने पुरस्कारासाठी अर्जासेाबत उदा-वृत्रपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो आदि देणे आवश्यक आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था सार्वजनीक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी, संस्था नोंदणी  झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. संस्थेचे  कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार संस्थेच्या सदस्यांना पेालिस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशनला) देणे आवश्यक राहील.
     युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या  पुरस्कारासाठी मुल्यांकन, संस्थेने केलेले  कार्य 1 एप्रिल ते  31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल, युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधनसंपत्ती जतन, संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहायभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग आदि बाबतचे कार्य, शिक्षण, प्रोढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रण,  व्यसनमुक्ती तसेच सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती  सुधारणा,  झोपडपटट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण आदि बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य.
    राज्यस्तरावर पुरस्कारासाठी एप्रिल अखेर प्रस्ताव www.sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  ऑनलाइवर सादर करावे, अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top