उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांना सूचित करण्यात येते की, शासकीय कर्मचारी / कंत्राटदार व पुरवठादार यांच्याबाबत वसूल करावयाच्या टीडीएस (आयकर) संदर्भात  17 फेब्रुवारी  रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत कार्यशाळा पेालीस अलंकार हॉल पोलीस मुख्यालयाजवळ, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.
    या कार्यशाळेत आयकर विभागाशी संबंधित अधिकारी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  या कार्यशाळेत उपस्थित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे. बैठकीस येताना आपल्या कार्यालयाचा टॅन क्रमांकाची झेरॉक्स प्रत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
Top