कळंब (भिकाजी जाधव) :- शिराढोण (ता. कळंब) येथील शरदचंद्र महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश मडके यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजेद चाऊस हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द वक्ते देवा चव्हाण हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतीश मडके म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपले ध्येय निश्चित करुन शिक्षण घेतले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण दडलेले असतात, त्या गुणांना वाव देवून सांस्कृतीक, कला जोपासणे आवश्यक असल्याचे सांगून जीवनामध्ये येणा-या संधी ओळखून संधीचे सोने केले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी विविध विषयावर भाष्य करणा-या कविता ऐकवल्या तर देवा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे महत्त्व पटवून सांगितले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये मेहंदी, रांगोळी, पाककला, वाद-विवाद स्पर्धा, काव्य वाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणा-या विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचे उदघाटन सतीश मडके व देवा चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी.एम. शिरमाळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.एस.एम. दळवी यांनी केले. तर प्राचार्य साजेद चाऊस यांनी आभार मानले.