नळदुर्ग -: भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्‍यांची अर्धांगिनी म्‍हणून बाबासाहेबांच्‍या दुबळया संसाराची जबाबदार पाडत डॉ. आंबेडकरांच्‍या कार्यात मातोश्री रमाई आंबेडकर यांनी दिलेले योगदान हे अनमोल असून त्‍यांच्या त्‍यागाचे मोजमाप हे कोणत्‍या परिणाम्‍यात करता येत नाही, असे प्रतिपादन कास्‍ट्राईब कर्मचारी संघटनेचे सोलापूर जिल्‍हाध्‍यक्ष कमलाकर बनसोडे यांनी वागदारी (ता. तुळाजपूर) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍सव कमिटी वागदरी (ता. तुळजापूर) च्‍यावतीने रमाई भिमराव आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍ताने वागदरी येथे आयोजित कार्यक्रमात कमलाकर बनसोडे हे बोलत होते. ते पुढे बोलताना म्‍हणाले, माता रमाईने अनेक यातना सहन करुन डॉ. आंबेडकरांना जिवनाच्‍या अखेरपर्यंत खंबीर साथ दिली. म्‍हणूनच बाबासाहेब भारतीय राज्‍यघटनेचे शिल्‍पकार झाले. बाबासाहेबांना महामानव बनविण्‍यात रमाईंचा सिंहाचा वाटा असून त्‍यांचे जीवन कार्य हे सर्वांना, महिलांना अखंडपणे प्रेरणा देणारे आहे.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सामाजिक कार्यकर्त्‍या संगिता गायकवाड तर प्रमुख प्रमुख पाहुणे म्‍हणून सहशिक्षक भैरवनाथ कानडे, आधार सामाजिक संस्‍थेचे दयानंद काळुंके आदीजण उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर यांच्‍या प्रतिमांचे पूजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करुन संगिता गायकवाड यांचा त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय सामाजिक कार्याबद्दल यथोचित सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड यांनी केले तर आभार चंद्रकांत वाघमारे यांनी मानले. यावेळी     शिवाजी वाघमारे, महादेव वाघमारे, माजी सरपंच नागनाथ बनसोडे, कुंडलिक वाघमारे, सोमा वाघमारे, ग्रा.पं. सदस्‍या कविता गायकवाड, गिता झेंडारे, वंदना वाघमारे, मुक्‍ता वाघमारे, कमल धाडबे, उज्‍वला वाघमारे यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते.
 
Top