पांगरी (गणेश गोडसे) :- दुकानात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरटयाने दुकानातील तांब्याच्या तारेचा सात हजार रूपये किंमतीचा बंडल चोरून नेल्याची घटना पांगरी (ता. बार्शी) येथील बाजारपेठ भागातील विशाल इलेक्ट्रीकल्स या दुकानात घडली.
विशाल विश्वनाथ डेंगळे (वय 26) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांचे बाजारपेठ भागात मोटार रिवाईंडींगचे दुकान असुन ते दुपारी लघुशंकेसाठी दुकानातुन बाहेर गेले असता ती संधी साधुन अज्ञात चोरटयांनी दुकानात प्रवेश करून दुकानात मोटारवाईंडींगसाठी आणुन ठेवलेल्या कॉपरच्या वायरची चोरी केली आहे. डेंगळे याच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात अज्ञात चोरटयांविरूदध चोरी करून नुकासान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शिवाजी मोसलगी हे करत आहेत.