पांगरी (गणेश गोडसे) :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत कांदा प्रात्याक्षिकांतर्गत बार्शी तालुक्यात पुरवण्‍यात आलेल्या कांदयाची शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून उत्पादकांना मार्गदर्शन केले.
    आत्मा योजनेंतर्गत राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठाण चितेगांव (नाशिक) यांच्या सहकार्याने सोलापुर जिल्हयात 721 शेतक-यांना 32 टन कांदयाचे बियाने उपलब्ध करून देण्‍यात आले होते. बार्शी तालुक्यातील 248 शेतक-यांना 882 क्विंटल बियाने निम्या किंमतीत उपलब्ध करून देण्‍यात आलेले होते. रब्बी कांदयासाठी देण्‍यात आलेल्या वानासाठी राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र नाशिक यांचे वरिष्ठ तज्ञ अधिकारी टी.पी.आंबरे, तज्ञ अधिकारी ए.के.मिश्रा, आत्माचे प्रकल्प उपसंचालक व्ही.एन.बरबडे, आत्माचे बार्शी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.टी.झिंजे, विषय विशेषज्ञ आर.एन.बगाडे यांच्यासह पथकांने बार्शी तालुक्यातील पांगरी, झानपुर, ममदापुर आदी भागातील लक्ष्मण बनसोडे, रामलिंग सुरवसे, नाना क्षिरसागर आदी कांदा ऊत्पादक शेतक-यांच्या प्रात्याक्षीक प्लॉटला भेटी देऊन कांदा उत्पादकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जानुन घेत कांदयाला दयावयाचे बेसल डोस फवारणी द्ववारे दयावयाची खते, पिक संरक्षण व कांदा चाळ आदी बाबीवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कांदयाच्या पिकांसंदर्भात कांही अडचणी असल्यास संपर्क साधण्‍याचे आवाहनही आंबरे यांनी केले आहे.
 
Top