पांगरी (गणेश गोडसे) :- साखर कारखान्याच्या स्टोअर शेडमधील साहित्य चोरुन नेऊन पाच लाख पंचेवीस हजार रूपयांचे नुकसान केल्याची घटना खामगांव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगर साखर कारखाना स्थळावर घडली.
    कारखान्याचे शाहुराजे रामभाऊ धाबेकर यांनी यासंदर्भात पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरूण अज्ञात चोरटयांविरूदध चोरीचा गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे. धाबेकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, अज्ञात चोरटयांनी कारखान्या बंद स्टोअर रूमचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून गणमेटलचा 150 ते 160 किलो वजनाचा ब्रास रौड बार तसेच पितळ धातुचा 200 कि.लो.ब्रास लायनर, अकरा नग स्टेनलेस, स्क्रीन 48 नग, 2.2 कॉपर प्लेट कॉपर केबल बंडल आदी साहित्य असा पाच लाख 26 हजार रूपयांचे साहित्य संमतीशिवाय व लबाडीने चोरून नेले आहे. पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करन्यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top