पांगरी (गणेश गोडसे) : ज्वारीचे पिक काढण्याच्या कारणावरून चौघांनी मिळुन एकाला काठीने मारहान करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. 6 फेब्रुवारी रोजी शेलगांव (ता. बार्शी) येथील शेतात घडली.
सचिन भारत गाढवे (वय 33, रा.दत्तनगर, बार्शी) असे काठी हल्यात गंभिर जखमी झालेल्या शेतक-याचे नांव असुन रमेश सिद्राम खांडेकर, राम किसन खताळ, चंद्रकांत सिद्राम व कुसुमबाई रूपनवर अशी काठीने मारहान करूण जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
जखमी सचिन गाढवे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते त्यांच्या मालकीच्या शेतातील ज्वारीचे पिक काढत असताना आरोपींनी त्यांना ज्वारीचे पिक काढु नकोस असे म्हणत हातातील काठीने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्यांनी मारहान करत त्यांच्या खिशातील रोख 20000 रूपये व हातातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असा पस्तीस हजार रूपयांचा माल हिसकावुन घेतला. गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात चौघांविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.