पांगरी (गणेश गोडसे) :- जातीपातीचे राजकारण न करता समाजसुधारण्‍यासाठी प्रयत्न करा, त्यातच खरी समाजसेवा घडते व समाजाची प्रगतीही साधली जाते, असे प्रतिपादन मातंग एकता आंदोलनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले.
    कुसळंब येथे बार्शी तालुका एकता आंदोलनच्यावतीने आयोजित शाखा उदघाटन व मातंग समाजाच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बागव हे बोलत होते. बागवे पुढे बोलताना म्हणाले की, समाजाला दिशा देण्‍यासाठी शासनाच्या विविध विभाग, महामंडळे यांच्या योजना, माहिती समाजाच्या पिचलेल्या घटकांना देऊन त्यांना प्रवाहात आणण्‍यासाठी प्रयत्न करा. अडचणींची सोडवणुक करण्‍यासाठी सदैव तत्पर राहील असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
    कार्यक्रमाला मातंग एकता आंदोलनचे प्रदेश सचिव अशोक कांबळे, प्रदेश समन्वयक विठ्ठल थोरात, उपाध्यक्ष किसनराव हनवते, सोलापुर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, उपाध्यक्ष दशरथ जाधव, संयोजक व बार्शी तालुकाध्यक्ष बालाजी झोंबाडे, महिला अघाडी तालुकाध्यक्ष निता पवार, जिल्हा उपाध्यक्षा शोभा झोंबाडे, बार्शी शहाराध्यक्ष नाथा मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामभाऊ वाघमारे, विठ्ठल थोरात, किसन हनुवते आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक शितल जाधव यांनी केले.
    कुसळंब येथे निवडण्‍यात आलेली कार्यकारिणी अशी -: अध्यक्ष दत्तात्रय झोंबाडे, उपाध्यक्ष हनुमंत झोंबाडे, खजिनदार नेताजी शिंदे, लक्ष्मण शिंदे. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी बालाजी झोंबाडे, अशोक शिंदे, सतिश पोटरे, प्रसाद झोंबाडे, लक्ष्मण थोरात, विशाल झोंबाडे, अनंत चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संदिप ठोंगे यांनी केले. कार्यक्रमाला बार्शी तालुक्यातुन मोठया संख्येनी समाजबांधव हजर होते.
 
Top