कळंब -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्‍या फेब्रुवारी महिन्‍याच्‍या वेतनासाठी तसेच महागाई भत्‍ता व भविष्‍यनिर्वाह निधीमध्‍ये जमा करण्‍यात येणा-या हप्‍त्‍यासाठी शिक्षक संचालक पुणे यांनी 31 कोटी रुपयांची आर्थिक तरतुद केली असल्‍याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे यांनी दिली आहे.
     उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्‍याचे वेतन रखडले होते. तसेच जुलै, ऑगस्‍ट व सप्‍टेंबर 2013 या तीन महिन्‍याचे महागाई वाढीच्‍या फरकाचे व सहाव्‍या वेतन आयोगातील भविष्‍य निर्वाह निधीच्‍या खात्‍यावर जमा करण्‍यात येणा-या चौथा व पाचवा हप्‍ताच्‍या रक्‍कमेसाठी आर्थिक तरतूद नसल्‍यामुळे 33 कोटीची देयके प्रलंबित होती. यासाठी महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संधाचे नेते संभाजीराव थोरात, मार्गदर्शक, प्रा. एस.डी. पाटील, राजाराम वरुटे, प्रदेश कार्याध्‍यक्ष बाळकृ्ष्‍ण तांबारे, कोषाध्‍यक्ष अंबाराज वाजे या राज्‍यस्‍तरीय पदाधिका-यांनी दि. 14 मार्च रोजी पुणे येथे शिक्षण संचालक महावीर माने व शिक्षण सहसंचालक गोविंद नांदेडे यांना आर्थिक तरतुद करण्‍याबाबत विनंती केली होती. त्‍यानुसार दि. 21 मार्च रोजी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथून उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील शिक्षकांच्‍या फेब्रुवारी महिन्‍याच्‍या वेतनासाठी तसेच थकित महागाई वाढीच्‍या फरकासाठी व सहाव्‍या वेतन आयोगातील भविष्‍य निधी मध्‍ये जमा करण्‍यात येणा-या चौथा व पाचवा हप्‍ताकरीता 31 कोटी रुपयाची आर्थिक तरतुद करण्‍यात आल्‍याचे बाळकृष्‍ण यांनी सांगितले.
    ही तरतुद तात्‍काळ केल्‍याबद्दल उस्‍मानाबाद जिल्‍हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष एल.बी. पडवळ, अशोक जाधव, सोमनाथ टकले, संतोष देशपांडे, भक्‍तराज दिवाणे, प्रदीप मदने, सुरेश वाघमोडे, नंदकुमार मोरे, मनोज चौधरी, दत्‍ता पवार, राजेंद्र गव्‍हाणे, संतोष मोळवणे, सुरदर्शन जावळे आदींनी स्‍वागत केले आहे.
 
Top