उस्मानाबाद :- ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जयराज नाईक यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मतदार संघातील नागरिकांना उमेदवार व राजकीय पक्षांच्या निवडणूकविषयक खर्चाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांना श्री. नाईक यांच्याशी थेट संपर्क साधता येईल.
नाईक यांचा निवास सध्या शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे असून तेथील लॅडलाईन/ फॅक्स क्रमांक 02472-229573 असा आहे तर मोबाईल क्रमांक 7588190299 असा आहे. खर्च विषयक तक्रारी नागरिक या क्रमांकावर थेट करु शकतील,असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.