उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिस-या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 
        रेवण विश्वनाथ भोसले (जनता दल सेक्यूलर, रा. ईट, ता. भूम), नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष, रा. उपळा पाटी माकडाचे, ता.उस्मानाबाद)‍आणि श्रीमती उज्वला  एकनाथ जाधव(अपक्ष, रा. दासरी प्लॉट, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
      दुपारी तीन वाजेपर्यंत या तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
 
Top