उस्मानाबाद -: 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुक प्रक्रिया सुरु असून निवडणूकीचे मतदान दि.17 एप्रिल ,2014 रोजी तर मतमोजणी दि.16 मे,2014 रोजी होणार आहे. 
      निवडणूक प्रक्रिया जिल्ह्यात शांततेने पार पडावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना 22 मार्च ते 20 एप्रिल,2014 या कालावधीत नियमनात्मक अधिकारी जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी प्रदान केले आहेत.
      मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून या अंतर्गत संबंधित अधिकारी  मिरवणूक अथवा जमावास आवश्यक ते निर्देश देऊ शकतील आणि त्या निर्देशाचे पालन करणे संबंधितास बंधनकारक असेल. सदर आदेशांचे उल्लघंन करणा-यांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
 
Top