उस्मानाबाद -: वाहनावर विनापरवाना प्रचाराचे पोस्टर्स, झेंडे व स्पिकर साहित्य लावणे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात विना परवाना सभा घेणे व स्पिकरचा वापर करणे, वाहतूकीला अडथळा निर्माण करणे, ध्वनीक्षेपकांचा विना परवाना वापर करणे, यासह निवडणूक विषयक आदर्श आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी रोहन सुभाष देशमुख या अपक्ष उमेदवाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उस्मानाबाद नगर परिषदेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख आणि वाहनचालक मालक तसेच इतर दीड ते दोन हजार कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद यांनी दिली आहे.