नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथे दोन दुभती म्हशी व दोन बैल असे मिळून चार जनावरांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना घडली उघडकीस आली. या घटनेने शेतक-यांसह पशुपालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या शिवयोगी शिवाचार्य मठाची शेतजमीन शंकर रामा घोडके हे कसतात. गुरूवारी सकाळी घोडके यांनी सर्व १४ जनावरांना हौदातील पाणी पाजून झाडाखाली बांधली होती. मात्र त्यातील दोन बैलांसह दोन दुभत्या म्हशींचा बांधलेल्या जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तलाठी डी.एन.गायकवाड यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कोळेकर यांनी चारही जनावरांचे शवविच्छेदन केले असून अहवालानंतरच जनावरांच्या मृत्यूचे गूढ उलगडणार आहे. चारही जनावरांचा मृत्यू विषबाधेने झाला म्हटले जात असले तरी इतर दहा जनावरांनीही त्याच हौदातील पाणी प्यायले होते. त्यामुळे जनावरांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे मात्र अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.