उस्मानाबाद -: उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज शनिवार रोजी महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शनिवार दि. 22 मार्च रोजी प्रा. रविंद्र गायकवाड यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. धारासूर मर्दिनी मंदिरापासून या रॅलीस प्रारंभ होऊन नेहरू चौक, पोलीस स्टेशन, आंबेडकर पुतळा, शिवाजी चौक मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात धडकली. ’जय भवानी आणि जय शिवाजी’ या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, सुधीर पाटील, दिनकर माने, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदीजण उपस्थित होते.