उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी सोमवारी ईलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र असणा-या जागेची पाहणी करुन तेथील सुरक्षिततेचा आढावा घेतला. त्याचबरोबर शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील मतमोजणीसाठीच्या जागेचीही त्यांनी पाहणी केली.
    उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभुदय मुळे, उपजिल्हाधिकारी बी.एस.चाकूरकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीरंग तांबे, उफविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वृषाली कडूकर आदी यावेळी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रांची सुरक्षितता महत्वाची आहे. याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधितांना केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.                                
 
Top