पांगरी (गणेश गोडसे) : फोनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एका चारचाकी वाहनातुन दोन रॉकेलचे बॅरल पोलिसांनी हस्तगत केल्याची घटना बार्शी लातुर राज्यमार्गावर जामगांव (आ.) ते कुसळंब दरम्यान घडली. पांगरी पोलिसांनी रॉकेलने भरलेल्या बॅरलसह एक छोटा हत्ती, पिक अप ताब्यात घेतले आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब जाधव, जामगांव व वानेवाडी ग्रामस्थ यांनी छोटया हत्ती क्रमांक एम.एच.13एएन 5624 हा रॉकेलने भरलेल्या बॅरलसह पकडुन ठेवला होता. ग्रामस्थांनी पांगरी पोलिस ठाण्याचे भापकर यांना भ्रमण ध्वनीद्वारे माहिती देऊन त्यांना घटनास्थळावर बोलावुन घेऊन रॉकेल वाहनासह त्यांच्या ताब्यात दिले. पांगरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. अद्याप कोणाविरुध्‍दही गुन्हा दाखल करण्‍यात आला नाही.
 
Top