बेळगाव -: बेळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरच्या निवडणकुीत पुन्हा एकदा मराठी भाषिकाचे वर्चस्व सिध्द झाले. सोमवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मराठी भाषिकांच्या बेळगाव विकास आघाडीचे महेश नाईक यांची महौपारपदी तर रेणू मुतगेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
सोमवार दि. 10 मार्च रोजी सकाळी १० वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. या निवडणुकीत महापौर पदासाठी मराठी भाषिक नगर सेवकांच्या वतीने महेश नाईक यांनी अर्ज दाखल केला होता तर कन्नड उर्दू गटातून फहीम नायकवाडी यांनी अर्ज दाखल केला होता. फहीम नायकवाडी यांना २५ मते मिळाली तर महेश नाईक ३१ मते मिळवून विजयी झाले. उपमहापौर पदासाठी मराठी गटातर्फे रेणू मुतगेकर विरुद्ध कन्नड – उर्दू गटा तर्फे श्रेया जनगौडा यांच्यात लढत होती. या लढतीत रेणू मुतगेकर यांना ३१ तर श्रेया जन गौडा यांना २६ मते मिळाली.
बेळगाव महापालिकेवर आता पर्यंत २० वेळा मराठी भाषिक महापौर निवडून आले आहेत. महेश नाईक आणि रेणू मुतगेकर हे निवडून आल्यामुळे पुन्हा बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचेच वर्चस्व आहे हे सिद्ध झाले आहे.
बेळगाव महापालिकेवर आता पर्यंत २० वेळा मराठी भाषिक महापौर निवडून आले आहेत. महेश नाईक आणि रेणू मुतगेकर हे निवडून आल्यामुळे पुन्हा बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचेच वर्चस्व आहे हे सिद्ध झाले आहे.