लंडन :- या जगात विचित्र माणसांची मुळीच कमतरता नाही. ब्रिटनमधील एका 47 वर्षाच्या अमांडा नावाच्या घटस्फोटित महिलेने अापल्या शेबा नावाच्या कुत्र्याशी थाटामाटात लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला दोनशे लोक पाहुणे म्हणून उपस्थित होते. वीस वर्षापूर्वी तिने ज्या माणसाशी विवाह केला होता, त्याने अलीकडेच तिची साथसंगत सोडली. मात्र, कुत्र्यासारखा निष्ठावान प्राणी आपली साथ सोडणार नाही. या भावनेतून तिने हा विवाह केला. माझे जीवन मी मला हवे तसे जगणार असल्याचे तिने सांगितले. अर्थातच, या अनोख्या विवाहाची चर्चा झालीच.