उस्मानाबाद -: लोकसभा निवडणूक काळात उमेदवार आणि राजकीय पक्ष यांना आदर्श आचारसंहिता कालावधीत द्यावयाच्या विविध आवश्यक परवानग्यांसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष सुरु करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
    भारत  निवडणूक आयोगाने निवडणूक लढवणारा उमेदवार आणि राजकीय पक्ष यांना आदर्श आचार संहिता कालावधीत अशा प्रकारचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार स्तरावर एक खिडकीद्वारे हे परवाने निर्गमित करण्यासाठी सर्व यंत्रणा यांनी त्यांचे सक्षम प्रधिकारी या एक खिडकी कक्षात कार्यालयीन वेळेत उपलब्ध ठेवावेत. संबंधितांनी देण्यात आलेल्या परवानगीच्या प्रती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सर्व कक्ष प्रमुख यांना तात्काळ देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 
Top