पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथे विविध महिला बचत गटांतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी अनेक कार्यक्रमांनी व उत्साहात साजरी करण्‍यात आले. 
    बाजारपेठ भागातील एकता महिला बचत गट व चैतन्य महिला बचत गट या बचत गटांतर्फे अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दिन व जागतिक महिला दिनी विविध स्पर्धा महिलांच्या करमणुकीचे व मार्गदर्शनाचे कार्यक्रम पार पडले.
    एकता महिला बचत गटांतर्फे सावित्रीबाई पुण्यतिथी दिवशी पार पडलेल्या कार्यक्रमात अंताक्षरी, चेंडुफेकख्‍ उखाने, प्रश्‍न-उत्तरे आदी विविध स्पर्धासह विविध कार्यक्रम घेण्‍यात आले. प्रास्ताविकात एकता बचत गटाच्या अध्यक्षा सौ.साधना गोडसे यांनी स्त्री ही माता, बहीण, मुलगीख्‍ सुन आदी विविध भुमिका पार पाडत असुन सावित्रीबाईंनी दिलेल्या सामाजिक लढयावर भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा वासकर होत्या. सौ.कमल राऊत यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. गटातर्फे घेन्यात आलेल्या स्पर्धेत रतन काळे प्रथम, शहनाज शेख द्वितीय तर शिवानी वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. परिक्षक म्हणुन विजय बचुटे व रामचंद्र राऊत यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी सचिव सुनिता वाघमारेख्‍ पदमीन बचुटे, अलका मुंढे, कलावती तुळजापुरे, प्रतिभा येडे, द्वारका काळे, कल्पना कदम, प्रमिला वासकर, तहसिन पटेल, सुरेखा महामु,नी उज्वला पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल बचुटे यांनी केले.
    चैतन्य महिला बचत गटातफेर्ही खेळा छान आणि मिळवा पैठनीचा मान या बौध्‍दीक व मनोरंजनात्मक खेळासह महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचेही आयोजन करण्‍यात आले होते. संगीत खुर्ची, अभिनय करणे, रिंगा टाकणेख्‍ ऊखाने या स्पर्धा घेण्‍यात आल्या. बचत गटाच्या अध्यक्षा सौ. भारती नारकर यांनी अध्यक्षीय भाषणात बचत गटाची माहिती सांगुन त्या मागचा उद्देश विषद केला. कौशल्या माळी, विदया शिंदे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी घेण्‍यात आलेल्या स्पर्धेत प्रथम रागिनी वासकर, द्वितीय रतन काळे तर तृतीय नसिमा बागवान यांनी बक्षिसे मिळवली. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी सचिव सुनंदा नारकर, सदस्या उज्वला मांधळे, प्रतिभा मेहंदळे, स्मिता नारकर, कौशल्या माळी, अलका नारकर, महानंदा जाजु, अनिता विश्‍वासे, आशा गुरव, रेणुका गुरव, सुरेखा पंडित, उषा देशपांडे, संध्या पाटील आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अश्‍विनी बुडुख यांनी तर आभार सुलभा देशपांडे यांनी मानले.
 
Top