सोलापूर -: येत्या 23 ते 26 मार्च 2014 या कालावधीमध्ये प्रादेशिक सेना 118 इन्फेंन्ट्री बटाालीयन ग्रीनेडीयरर्स फोर्ट सिताबर्डी, नागपूर येथे सैनिक (सर्वसाधारण), क्लार्क (सर्वसाधारण) व न्हावी  या पदाकरीता सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी दि. 23 मार्च 2014 रोजी सकाळी 5.30 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले नांव नोंदवावे.
      या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे - सैनिक पदाकरीता इयत्ता 10 मध्ये 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक, क्लार्क पदाकरीता इयत्ता 12 वी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक व न्हावी या पदाकरीता 10 वी पास असावा. या सर्व पदाकरीता उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी तसेच 42 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच भरतीच्या ठिकाणी नांव नोंदविलेल्या उमेदवारांनाच भरतीसाठी हजर राहता येईल याची नोंद घ्यावी असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी कळविले आहे.
 
Top