बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टिडीएफ संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
    यावेळी ज्येष्ठ सल्लागार अंबादास मस्के, राज्याचे सहकार्यवाह शिवाजीराव जमाले, हरिदास जाजनूरे, टिडीएफचे सचिव सचिन झाडबुके, नागनाथ राऊत, मोहन गायकवाड, धानप्पा हसरमणी, रविंद्र मठपती, तगारे, दोन्ही संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलतांना पोले म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी येणार्‍या अडचणी सांगाव्या. कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, कोणत्याही नियमबाह्य कामांना आपले कार्यालय साथ देणार नाही. संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांची बैठक लवकरच घेऊ, प्रलंबित प्रश्‍नांसाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना सक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले.

माध्‍यमिक शिक्षकांसाठी वरिष्‍ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
बार्शी :- शिक्षणसेवक पदाचा कालावधी वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरल्‍याचे यापूर्वीच शासनाने जाहीर केले आहे. वरिष्‍ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे महिन्‍यात होण्‍याची शक्‍यता आहे. ज्‍यांची बारा वर्षाची सेवा पूर्ण झाली असेल त्‍यांनी प्रस्‍ताव पाठवावे. सर्व शिक्षा अभियांनातर्गत एकवीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण नसलेल्‍या शिक्षकांनी मुख्‍याध्‍यापकांमार्फत शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) यांच्‍याकडे आठ दिवसांत प्रस्‍ताव पाठवावे, असे आवाहन सोलापूर जिल्‍हा माध्‍यमिक शिक्षक संघाचे अध्‍यक्ष मुकूंद साळुंके, सचिव झाडबुके, निलकंठ लिंगे, नागनाथ राऊत यांनी केले आहे.
 
Top