कळंब :- वृत्‍तपत्र क्षेत्रामध्‍ये प्रत्‍येक वाचकांच्‍या हाती पहाटे वृत्‍तपत्र पोहचवणारा महत्‍त्‍वाचा असनू, तो उपेक्षित आहे. त्‍याला विम्‍याचे कवच देऊन कळंब तालुका पत्रकार संघाने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला असल्‍याचे मत ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा. भास्‍कर चंदनशिव यांनी व्‍यक्‍त केले.
         कळंब तालुका पत्रकार संघाने तालुक्‍यातील पत्रकारांच्‍या विम्‍याचे कवच दिले. वृत्‍तपत्र क्षेत्रामध्‍ये पत्रकारांप्रमाणेच फोटोग्राुर, वृत्‍तपत्र एजंट तसेच वृत्‍तपत्र वाटप करणा-या मुलांनाही विम्‍याचे कवच द्यावे, ही संकल्‍पना पुढे आल्‍याने, तालुक्‍यातील 175 जणांना विम्‍याचे कवच देण्‍यात आल्‍याची माहिती पत्रकार संघाचे अध्‍यक्ष सतीश टोणगे यांनी दिली.
     कार्यक्रमाच्‍या प्रारंभी प्रा. भास्‍कर चंदनशिव यांचा सत्‍कार शिवप्रसाद बियाणी व बापूराव जाधव यांनी केले. कळंब पत्रकार संघाच्‍या या उपक्रमाचे कौतुक करुन वृत्‍तपत्र क्षेत्रात काम करणा-यांना विम्‍याची ख-या अर्थाने गरज असल्‍याचे मत प्रा. भास्‍कर चंदनशिव यांनी व्‍यक्‍त केले. यावेळी वृत्‍तपत्र वाटप करुन शिक्षण घेणा-या सागर कांबळे या विद्यार्थ्‍यांच्‍या विम्‍याची पॉलीसी देण्‍यात आली.
      यावेळी पत्रकार संघाचे अध्‍यक्ष सतीश टोगणे, शितलकुमार धोंगडे, परवेज मुल्‍ला, बापूराव जाधव, दिलीप गंभीरे,  शिवप्रसाद बियाणी, राजाभाऊ पवार, सतीश अडसूळ, मंगेश यादव, सतीश मडके, गणेश शेळके, रमेश अंबिरकर, विलास मुळीक, मयुर लोखंडे, माधवसिंह राजपूत आदी पत्रकार, एजंट उपस्थित होते.
            उपस्थितांचे आभार शितल धोंगडे यांनी मानले.
 
Top