
दि. ३० एप्रिल २०११ रोजी मासिक सभेच्या ग्रा.पं.ठराव क्र.५ मध्ये ३१५० चौ.फुट जागा सासरे जगन्नाथ मनोहर उमाप यांच्या नावे नोंद केली. सदरची नोंद ही बेकायदा व इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या संगनमताने करण्यात आली. जयंत मुंढे यांनी माहिती घेऊन त्याविरोधात अप्पर जिल्हाधिकारी काकडे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. घटनेची चौकशी करुन तक्रारीवर निर्णय देतांना महिला ग्रा.पं.सदस्य जयदेवी उमाप हिचे सदस्यत्व रद्द करुन घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. याप्रकरणी मुंढे यांच्या वतीने ऍड्. आर. यु. वैद्य व ऍड्. जे. बी. जाधवर यांनी काम पाहिले. दि.१३ डिसेंबर रोजी सदरच्या प्रकरणाचा निकाल लागला तरी तक्रारदारांना पोस्टाद्वारे निकालाची प्रत दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाली आहे.